राज्यस्तरीय अभिनय कार्यशाळा शनिवारी

राज्यस्तरीय अभिनय कार्यशाळा शनिवारी

राज्यस्तरीय अभिनय कार्यशाळा शनिवारी

कोल्हापूर प्रतिनिधी : मुबारक अत्तार

कलेच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या निर्मिती फिल्म क्लब कोल्हापूरच्या वतीने अभिनय, चित्रपट व नाटक निर्मितीची प्राथमिकता या विषयावर एक दिवशीय राज्यस्तरीय अभिनय कार्यशाळा शनिवार दि. 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता, राजर्षी शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केली आहे.

सदर कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा आणि जाती धर्माचे बंधन नाही.

दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापुरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक सुनिल कांबळे यांनी केले आहे.