HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलंच भोवलं असल्याच दिसून येतंय. आज त्यांनी आपला राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.  

यावर आता राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. त्यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असंही  धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.