राळेगाव ते धानोरा ,पोहणा मार्गे आजनसरा बस चालु होणार का ? प्रवासी प्रतिक्षेत
राळेगाव ते धानोरा ,पोहणा मार्गे आजनसरा बस चालु होणार का ? प्रवासी प्रतिक्षेत
संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी
यवतमाळ जिल्हातील अनेक भावीक संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी आजनसरा येते जात असतात आजनसरा हे गाव महाराष्ट्रातील एक प्रसिद्व असे गाव येथे संत भोजाजी महाराजांचे प्रसिद्व असे मंदिर येथे सपुर्ण महाराष्ट्रातील भाविक पुरणपोळीचा स्वंपाक करत असते ,दर बुधवारी व रवीवारी अफाट अशी गर्दी असतात ,यवतमाळ जिल्हातील खुप असे भाविक आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी जात असता राळेगाव तालुक्यातुन सुद्धा दर्शनासाठी गर्दी असतात मात्र राळेगाव एसटी डेपोतुन एकही बस आजनसरा येथे जाण्यासाठी नाही हि शोकांतींका म्हणावी लागेल ,राळेगाव ते धानोरा ,पोहणा, या मार्गे बस चालु व्हावी अशी अनेक प्रवाशाची ईच्छा आहे पण राळेगाव तालुक्यातील एकही लोकप्रतीनीधी लक्ष देण्यास तयार नाही ,अनेक गोरगरीब भाविक भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यास ईच्छुक असतात मात्र त्याना जाण्यासाठी काहिहि नसल्यामुळे पंचाईत येत असता तरीपण राळेगाव तालुक्यातील लोकप्रतिनीधीनी लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.