उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या वतीने जिल्ह्यासह शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत महा सराव सिईटीचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येत्या 29 तारखेला सकाळी दहा वाजता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवासेनेच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात आज शासकीय विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यामध्ये 1)NET -UG medical 2)MHT CET engineering 3)CET pharmacy 4) CET - law अशा पद्धतीने विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेची तीन केंद्रे ठरली आहेत. 1) के, एम, सी कॉलेज2)प्रभोधन अकॅडमी (देवणे सर )3)मोळे अकॅडमी (गांधी मैदान )ही परीक्षा ऑफलाइन होणार असून त्याची नोंदणी मात्र ऑनलाईन पद्धतीने केली आहे. नोंदणीसाठी शेवट तारीख दिनांक 20 मार्च ही आहे. नोंदणीसाठी https://yuvasenacet.com/ही लिंक आहे.या परीक्षेचा मुख्य हेतू सीईटी साठी सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव देण्याचा असून, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत जास्तीत जास्त प्रोत्साहन करणे हा आहे.
यावेळी या बैठकीसाठी युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने,उपजिल्हा प्रमुख बंडा लोंढे,जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे,उपजिल्हाप्रमुख सदाशिव पवार, सुनील चौगुले, महानगर प्रमुख सनराज शिंदे,शहर युवा अधिकारी सुमित मेळवंकी,ओमकार मंडलिक, शहर समन्वयक अक्षय घाडगे, कीर्ती कुमार जाधव, रोहित वेडे, शहर चिटणीस लतीफ शेख, अभिषेक दाभाडे, सहसमन्वयक शुभम पाटील तसेच युवती सेनेच्या शहर प्रमुख सानिका दामोडे,समन्वयक माधुरी जाधव, उपतालुका युवती प्रमुख समृद्धी गुरव, तालुका समन्वयक सचिन नागटिळक,उपशहर प्रमुख प्रथमेश रांगणे,विभागप्रमुख आकाश शिंदे,कनिष्क शिंदे आदित्य जाधव,संकेत गुरव, मुन्ना महाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.