"कोल्हापूर ग्रीन वळीवडे" यांच्यामार्फत वळीवडे गावातील स्टेडियम सभोवताली "महावृक्षारोपण " मोहीम

कोल्हापूर (प्रतिनिधी) - "कोल्हापूर ग्रीन वळीवडे" यांच्यामार्फत वळीवडे गावातील स्टेडियम सभोवताली "महावृक्षारोपण " मोहीम आयोजित केली होती. कणेरी मठाचे मठाधीश काड सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच पर्यावरणीय संवर्धनाचे मार्गदर्शन समस्त पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांना करण्यात आले.
या महावृक्षारोपण मोहिमे मध्ये वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, स्वामी समर्थ सेवा केंद्र,मास्तर ग्रुप, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, एबीपी स्पोर्ट्स, जय जिनेन्द्र तालीम, स्वराज्य मर्दानी आखाडा, झेड क्रॉप ग्रुप, पतंजली योग अँड रिसर्च फाउंडेशन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.