ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांचा रविवारी नागरी सत्कार क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा पुरस्काराचे वितरण
ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांचा रविवारी नागरी सत्कार क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा पुरस्काराचे वितरण
मुबारक अत्तार:-
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष आणि कामगार नेते सुरेश केसरकर यांचा जाहीर नागरी सत्कार रविवार दि. 5 मार्च, 2023 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असून यावेळी क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा या राज्यस्तरीय पुरस्काराचेही वितरण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष व निमंत्रक अनिल म्हमाने यांनी दिली.
सदर कार्यक्रमास माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव दिलीपदादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे आदी मान्यवरांची विशेष सन्माननीय उपस्थिती असणार असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्राचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, कोल्हापूरचे सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
सदर कार्यक्रम ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. डॉ. श्रीपाद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सन्माननीय उपस्थिती म्हणून खाजगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अजय दळवी, चंद्रकांत मोरे, सुधाकर सावंत, गौरी मुसळे, संजय सासणे, जॉर्ज क्रूझ, अशोक आलदर, शिवाजी चौगुले, छाया पाटील, नारायण धनगर, बाजीराव हेवाळे, रवींद्र श्रावस्ती, डॉ. उज्वल कोठारकर, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, शंकर अंदानी, मंगल श्रावस्ती, शंकर पुजारी, डॉ. सागर सानप, प्रा. माधव आग्री, चंद्रकांत सावंत, मोनिका तारमळे, डॉ. संदीप गायकवाड या मान्यवरांचा क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. सुरेश केसरकर नागरी सत्कार समिती, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र, नवश्रमिक सोशल फौंडेशन, महाराष्ट्र आणि निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष व निमंत्रक अनिल म्हमाने यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस सतीश मुसळे, महादेव चक्के, संजय सासणे, शिवाजी चौगुले, राहुल काळे, सुनिल कांबळे, अर्हंत मिणचेकर, अनुष्का माने आदी उपस्थित होते.