'मु. पो. बोंबिलवाडी' ची पहिल्याच दिवशी ६१ लाखाची कमाई
मुंबई: 'मु. पो. बोंबिलवाडी' ची सुरुवात झकास झाली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६१ लाखाची कमाई केली. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत प्रशांत दामले आहेत. त्यांनी हिटलरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे लेखन- दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. मधुगंधा कुलकर्णी व भरत शितोळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. १ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
'मु. पो. बोंबिलवाडी'सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. या सिनेमात मुख्य भूमिकेत - हिटलरच्या भूमिकेत कोण असणार? याबद्दल उत्सुकता होती. अखेर प्रशांत दामलेंचा चेहरा समोर आला आणि प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केलं. सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळं सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला गर्दी केली होती. यात महिलाप्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. तर अनेकांनी कुटुंबियांसोबत हा सिनेमा पाहून नवीन वर्षाची सुरुवात केली.