Rajeshwari Kharat :धर्मांतरानंतर शालू झाली ट्रोल, चाहत्यांना धर्मांतर करणे खटकले... शालू म्हणाली....

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या सिनेमातून राजेश्वरी खरात घराघरात लोकप्रिय झाली. अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या भरपूर चर्चेत आहे. नुकतेच ईस्टर संडे निमित्त तिने धर्मांतरण करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे बराच गदारोळ निर्माण झाला होता . राजेश्वरीच्या चाहत्यांना तिचे धर्मांतरण करणे खटकलेले त्यामुळे त्यांनी दिला ट्रोल करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी राजेश्वरी ने हे सर्व पैशांसाठी केले. असे म्हणत ट्रोल केल आहे.
बरेचदा इतर धर्मीय लोक लोकांना आपल्या धर्मात धर्मांतरण करून घेण्यासाठी पैशांची लालूस दाखवतात. त्या पैशांच्या आमिषा पोटी लोकही आपला धर्म सोडून दुसरा धर्मात सहज जातात. राजेश्वरी बाबत सुद्धा असेच झाले असावे असे काहींनी म्हटले. तर काहींनी ती हे सर्व प्रसिद्धीसाठी करत असल्याचे सांगितले. यावर आता स्वतः राजेश्वरी खरात हिने मौन सोडले आहे.
राजेश्वरी खरातने एक पोस्ट शेअर केली होती. मात्र नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली. सोबतच तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची पोस्टही डिलीट केली. मात्र तिच्या त्या सोशल मीडिया स्टोरी चे फोटो आधीच व्हायरल झालेले. त्यात ती म्हणाली, निवडणुका प्रत्येकी ५०० रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब दैवत देव माणूस हे आज धर्म जात शिकवायला आले आहेत.... तुमचे स्वागत आहे.
कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एक तर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे.... टीप- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हे दोन्ही स्वीकारली जावी एवढी विनंती. राजेश्वरी खरात.
राजेश्वरी ने ही पोस्ट काही वेळातच डिलीट केली मात्र त्याआधीच ती व्हायरल झालेली. ज्यावर प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकाने लिहिले- तो तुझा किंवा तुझ्या नेत्यांचा भ्रम आहे. तर दुसऱ्यांनी लिहिले जन्म जर ख्रिश्चन कुटुंबातला आहे तर पुन्हा धर्म स्वीकारण्याचे लॉजिक...? तर दुसऱ्याने लिहिले की- राजेश्वरी ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले नाहीत. नाहीतर तिने असं पाऊल उचलला नसतं.