कागलचं "लोकप्रिय नेतृत्व" माजी आमदार संजयबाबा घाटगे

कागलचं "लोकप्रिय नेतृत्व" माजी आमदार संजयबाबा घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  कागलचे भाग्यविधाते, अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था व अन्नपूर्णा शुगरचे संस्थापक, हरितक्रांतीचे प्रणिते, जनसामान्यांच्या सुख - दुःखात सहभागी होऊन प्रत्येक कार्यकर्त्याबरोबरच उपेक्षितांच्या हाकेला धावून जाणारे भूमिपूत्र, कागल तालुक्याबरोबरच जिल्ह्यात आपल्या समाजकारणातून राजकीय क्षेत्रात स्वतःचा दबदबा असणारे , गरजू, गरीब, कष्टकरी, दलित, मध्यमवर्गीय, नोकरवर्ग हीच ज्यांची बलस्थाने आहेत असे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक संजयबाबा घाटगे यांनी गेली चाळीस वर्षे आपल्या गटाचे वेगळे अस्तित्व टिकवत जनसामान्यांच्या हृदयसिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अर्थात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा आज मंगळवार 22 एप्रिल रोजी वाढदिवस.

गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये कोणतीही प्रबळ सत्ता नसताना अगर सक्षम पाठबळ नसताना निष्ठावंत कार्यकर्ते व उभारलेल्या संस्थांचा पारदर्शी कारभार. यामुळेच अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्था अल्पावधीतच कर्जमुक्त होऊन जिल्ह्याबरोबरच राज्यात नावारूपाला आली. अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेच्या यशस्वी वाटचालीनंतर अन्नपूर्णा शुगरची उभारणी अनेक नैसर्गिक व आर्थिक संकटांशी सामना करत यशस्वी उभारणी केली व प्रत्येक गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण क्षमतेने पार पडला.

कागलच्या पांढऱ्या पट्ट्यातील साके, व्हनाळी, केनवडे, गोरंबे, सावर्डे खुर्द, सावर्डे बुद्रुक, सावतवाडी, शेंडूर, हदनाळ या उपेक्षित पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना माजी आमदार संजय घाटगे यांनी अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून सुमारे पाच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणून हरितक्रांती केली . डोंगरमाळाचे नंदनवन केले. त्या माळरानात हजारो टन उसाचे उत्पादन झाले. त्या उसाची वेळेवर उचल करून इतर सक्षम कारखान्यांबरोबर पहिली उसाची उचल एकरकमी देऊन ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास संपादन केला. लाखो टनांचे गाळप झाले. हंगाम यशस्वीपणे पार पडला. याचे सर्व श्रेय संजयबाबा घाटगे, अंबरिषसिंह घाटगे व कुटुंबीयांनाच जाते. कारण अनेक नैसर्गिक, आर्थिक संकटाशी सामना करत रात्रं-दिवस अन्नपूर्णा शुगर साठी झगडले.

अन्नपूर्णा शुगरमुळे डोंगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. अन्नपूर्णा जॅगरी पावडरला केमिकलमुक्त असल्याने राज्याच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अल्पावधीत पारदर्शी कारभार व निष्ठावंत कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर येत्या काळात अन्नपूर्णा शुगर राज्यात आणखीन आदर्शवत होणार, यात शंकाच नाही. अशा या कृतिशील नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार संजय बाबा घाटगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!