HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महिलांच्या आरोग्य विषयक मार्गदर्शन - शाहूवाडी ता. पत्रकार संघ व अंगणवाडी

महिलांच्या आरोग्य विषयक मार्गदर्शन - शाहूवाडी ता. पत्रकार संघ व अंगणवाडी

मलकापूर प्रतिनिधी:- रोहित पास्ते 

    आपले आरोग्य निरोगी  राखण्यासाठी व्यायाम, संतुलित आहार याचा अवलंब करून आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास, आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहू शकतो असे प्रतिपादन डॉ. वर्षा ठोंबरे यांनी ठाणेवाडी येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. 

      शाहुवाडी तालुका पत्रकार संघ व ठाणेवाडी येथील अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य विषयक आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार, उपाध्यक्ष रमेश डोंगरे, रोहित पास्ते, अंगणवाडी पर्यवेक्षिका एम.आर. काटकर, छाया चाळके, अंगणवाडी सेविका प्रतिभा सुतार, आशा सेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. वर्षा ठोंबरे म्हणाल्या की, सध्याचे युग हे अतिशय धावपळीचे आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आपणाला पुरेसा वेळ मिळत नाही, आणि मग विविध कारणाने आपल्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. यासाठी आपण वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. विशेष करून महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून आपण आपल्या आरोग्यासाठी काळजी घेतली पाहिजे.

     यावेळी पर्यवेक्षिका एम.आर. काटकर त्याचबरोबर चिमुकली विद्यार्थीनी संसा सुतार हिने मनोगत व्यक्त केले. परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ठाणेवाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिभा सुतार यांनी सुत्रसंचलन केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.