येलूर (ता.शाहूवाडी) येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

येलूर (ता.शाहूवाडी) येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते 

    येलूर गावात २ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ पार पडला.

शाहूवाडी तालुक्यातील येलूर येथे प्राथमिक शाळा इमारत बांधणे - ४५ लाख,येलूर पैकी जाधववाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे - ६ लाख,येलूर येथे स्मशान शेड बांधणे - ३ लाख,येलूर पैकी शेळकेवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे - १० लाख,येलूर पैकी म्हावळेवाडी व शेलारवाडी येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे - २६ लाख,जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना करणे - १ कोटी ५० लाख, येलूर पैकी जठारवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे - ८ लाख अशा एकूण २ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या व गावातील ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड,माजी बांधकाम सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),शाहूवाडी पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, एम्पथी फौंडेशनचे मॅनेजर दिनेश झोरे,येलूर गावच्या मा.सरपंच कमल तुकाराम पाटील,येलूर विकास सोसायटी चेअरमन मारुती राऊ शेळके,मा.सरपंच शंकर चौगुले,मा.उपसरपंच संदिप जाधव,अरविंद म्हावळे,मा.ग्रामपंचायत सदस्य अशोक आलेकर,सुरेखा वाघमारे,लक्ष्मी सुतार,छाया शेळके,ग्रामपंचायत सदस्य मनोज भोसले,संतोष शेलार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक नाना नायकवडी,डी.वाय.पाटील - शिवारे,शंकर जाधव,गणपती शेळके,कुलदिप चौगुले यांच्यासह सर्व पदाधिकारी,शिक्षक,ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते