आक्षेपार्ह स्टेटसमुळे मलकापूर मध्ये तणाव

आक्षेपार्ह स्टेटसमुळे मलकापूर मध्ये तणाव

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते 

  सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज संदर्भात संबंधित युवकांने शांतता भंग करण्याचा प्रयत्न करून समाजात तेढ  निर्माण होईल असे कृत्य केले. सोहेल टिपूसुलतान मालदार व वडील टिपूसुलतान हैदर मालदार यांच्या वर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनेसह सर्वच संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना दिले. पोलीस उपनिरीक्ष प्रियांका सराटे यांनी निवेदन स्विकारले. दरम्यान सोमवारी रात्रीच संबंधीत युवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले.

  निवेदनातील नमूद मुद्दा, उचत पैकी लहीन गल्ली येथील युवक सोहेब मालदार या युवकाने दोन समाजात   धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याची बाब निदर्शनास आली. या घटनेचे मलकापूर शहरात चांगलेच पडसाद उमटले आहेत. सदर युवकाने वारंवार समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबत त्याच्यावर कडक कारवाई करावी. शाहूवाडी तालुक्यात सध्या सुरू असणाऱ्या सर्व मदरसा मधील कामकाजाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या वेळी बोलताना प्रवीण प्रभावळकर म्हणाले की, सलोखा व शांतता कायम राहावी यासाठी सर्व हिंदू समाज बांधव सहकार्य करत आहेत. कुणीतरी मात्र दोन समाजात तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा होत असलेला प्रयत्न हा दुर्दैवी असून यापुढे अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाही. पोलीस प्रशासनाने  त्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा शाहूवाडी तालुका बंद करण्याचा  इशारा यावेळी देण्यात आला. 

    सदर निवेदनावर प्रवीण प्रभावळकर, युवराज काटकर, महेश विभूते, दिनेश पडवळ आदी नागरीकांनी स्वाक्षरी केली.