अजित पवार गटाला मोठा धक्का!

अजित पवार गटाला मोठा धक्का!

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं  आहे. एकीकडे महाविकास आघाडीची निवडणुकी संदर्भात दौरे होत असून दुसरीकडे महायुतीची देखील दौरे होत आहेत.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भाग्यश्री आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.