भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई वृत्तसंस्था; विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीनुसार, कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक तर इचलकरंजी मधून राहुल आवाडे यांचे पहिल्या यादीत नाव जाहीर झालं आहे. यासोबतच आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. याशिवाय नुकताच काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनाही भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना भाजपाने भोकर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.