अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी-समरजितसिंह घाटगे

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी-समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी ) : महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकरी व नागरिकांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. यासाठी भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी कागल,गडहिंग्लज,आजराचे संबधित तहसीलदार यांना घटनास्थळावरून फोन केले.

गडहिंग्लज परिसरातील पुरबाधित भागाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी तलाठी किल्लेदार हजर होते.

कागल,गडहिंग्लज,आजरा तालुक्यातील नदीकाठा शेजारील काही गावांत अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेले आहे. नद्यांच्या काठाशेजारील क्षेत्रातील ऊस, भात, भुईमुग,सोयाबीन आदी पिके महापुराच्या पाण्याखाली बुडाली आहेत.तसेच अनेक घरांची पडझडही झालेली आहे.अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले आहे.या पुर परिस्थितीमुळे मोटरपंप व मोटरपेटया पाण्यात बुडुन खराब झाल्याने सुद्धा शेतक-यांचे नुकसान झाले आहे.तसेच गणेश मुर्तींचे काम अंतिम टप्प्यात असलेल्या भागात पाणी शिरले आहे.त्यामुळे शेतकरी,नागरिकांसह कुंभार बांधवांचे नुकसान झाले आहे.

 या सर्व नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकरी व नागरिकांना त्वरीत नुकसान भरपाई मिळणेबाबत कार्यवाही व्हावी.अशा सुचना घाटगे यांनी अधिका-यांनाही दिल्या.

यावेळी राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे , सुदर्शन चव्हाण, अझर बोदघर, अभिनंदन पाटील, दिगंबर विटेकरी, विक्रांत कदम, भीमा कोमारे,सचिन खानगावे,अक्षय मगदूम, चंद्रकांत कुंभार, यशवंत कुंभार, आदी उपस्थित होते.