'गोकुळ’ मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक, अधिकारी यांच्या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, औक्षण व पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संघाचे संचालक रणजितसिंह पाटील, बयाजी शेळके, दत्तात्रय पाटील (केनवडेकर), सूर्यकांत पाटील, जयदीप पोवार, विकास पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.