अनुष्काच्या 'त्या' ब्रेसलेटची होतेय सर्वत्र चर्चा , आऊटफिटवर केला तब्बल 'इतका' खर्च

मुंबई : भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली . त्याच्याच फलंदाजीमुळे भारत फायनलमध्ये धडक मारू शकला. विराटच्या नेहमीच सोबत असणारी त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती.
अनुष्का अनेकदा स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येत असते. प्रत्येक वेळी तिचा हटके लुक पाहायला मिळतो. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल वेळी देखील अनुष्काता खास लुक पाहायला मिळाला. डेनिम शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स असा खास लुक चर्चेत आला आहे. यानंतर तिच्या या आऊटफिटची चर्चा देखील होतेय.
तर अनुष्कानं घातलेल्या ड्रेसची, तसंच ज्वेलरीची किंमत काही लाखांमध्ये आहे. डेनिम शर्टचीच किंमत तब्बल २८, ३५६ रुपये हे. तर शॉट् पॅन्ट २६ हजारांची आहे. तर तिच्या हातात असलेलं हिऱ्यांचं ब्रेसलेट तब्बल काही लाखांचं नाही तर १ कोटी पंधरा लाखांचं आहे. तर तिच्या हातात आणखी एक ब्रेसलेट पाहायला मिळतंय, त्याची किंमत तब्बल १५ लाख आहे.
तर अनुष्काच्या हातात एक काळ्या रंगाची प्राडा ब्रॅन्डची बॅग आहे. या बॅगची किंमतही १ लाख ७५ हजार इतकी आहे. तर तिच्या पायात असलेले सॅन्डल्स हे १२ ते १३ हजारांचे आहेत. त्यामुळं एकूण किंमत पाहिली तर अनुष्काच्या या लुकसाठी तिनं दीड कोटींच्यावर खर्च केलाय.