रविंद्र धंगेकर यांचे काँग्रेस सोडण्यामागचे कारण संजय राऊत यांनी सांगितले, म्हणाले धंगेकर...

रविंद्र धंगेकर यांचे काँग्रेस सोडण्यामागचे कारण संजय राऊत यांनी सांगितले, म्हणाले धंगेकर...

मुंबई : कॉँग्रेसचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कॉँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता गेल्याने काँग्रेसला हा मोठा झटका म्हणावा लागेल. रविंद्र धंगेकरांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवलं होतं. आता निवडणुका झाल्यावर त्यांनीच पक्षाला रामराम केल्याने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

रविंद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी त्यांचे जे दैवत असतील त्यांना स्मरून सांगावं. विकासकामासाठी गेले की त्यांच्या कसबा मतदारसंघात गणेश पेठ येथील एक जागा  आहे. जी प्रतिभा धंगेकर आणि त्यांच्या पार्टनरच्या नावावर आहे. हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न असून त्या जागेची किंमत ६० कोटी असं म्हणतात. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये ही जागा वक्फ बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून भाजपचे लोकं कोर्टात गेले. ते काम अडवण्यात आलं, त्या कामाची  स्टॉप ऑर्डर काढण्यात आली. प्रतिभा धंगेकरांवर अटकेची तलवार निर्माण झाली हे वातावरण धंगेकरांनी पक्ष सोडण्यासाठी निर्माण करण्यात आलं. 

आश्चर्य म्हणजे त्यांच्या सोबतचे जे पार्टनर आहेत ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत आणि मनसेच्या माजी नगरसेवकाची पत्नीसुद्ध असल्याची माझी माहिती आहे. गुंतवणूक केल्यावरसुद्धा त्यांची कोंडी करण्यात आली. खटले दाखल करण्यात आले, पत्नीला अटक होईल अशी भीती त्यांना वाटली. या भीतीपोटी विकासकाम रखडली आहेत या सबबीखाली आमचे प्रिय रविंद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाल्याच्या दावा संजय राऊतांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीला धंगेकर उभे राहिले तेव्हापासून हा दबाव सुरू झाला. त्यांची बदनामी, कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. ती जागा त्यांच्या पत्नीच्या जागेवर असल्याची माझी माहिती आहे. पक्षात हे आले ते आले पण ते का आले हे शिंदे आणि अजित गटाने सांगायला हवं, असा सवाल राऊतांनी केला आहे.