.... अन्यथा फये धनगर वाड्यावरील शाळेस कुलूप लावू- यशवंत क्रांती संघटना
भुदरगड (प्रतिनिधी) : फये ता. भुदरगड येथील धनगर वाड्यावरील शाळेत दोन शिक्षक कार्यरत असताना गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेतील एक शिक्षक दुसऱ्याच शाळेत कार्यरत असल्याने दुर्गम भागातील या शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी सदर शिक्षकाची कामगिरी रद्द करण्यात यावी अन्यथा शाळेस कुलुप लावण्यात येईल असा आशयाचे निवेदन यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून फये धनगर वाड्यावरील ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना दिले.
यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि फये पैकी धनगरवाडा ता. भुदरगड जि कोल्हापूर येथील शाळा ही अतिशय दुर्गम भागातील असुन शाळा १ली ते ४ थी पर्यंत वर्ग आहेत. शाळेत दोन शिक्षक बदलीने हजर झाले आहेत.परंतु एका शिक्षकास कामगिरी वर इतर शाळेत पाठवले आहे. शाळेला जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन शिक्षक नियुक्ती असताना दुसऱ्या शिक्षकांच्या उपस्थितीबाबत सर्व ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट दिवशी मुख्याध्यापकांना विचारले असता. सदर शिक्षक इतर शाळेत कार्यरत असले बाबत सांगितले.
कृपया सदर शिक्षकाची इतर शाळेतील कामगिरी रद्द करण्यात येऊन फये शाळेत नियुक्त करून मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. तालुक्यामध्ये कमीपटाच्या शाळा असून त्या ठिकाणी प्रत्येकी दोन शिक्षक कार्यरत आहेत प्रत्येक वेळी इतर शाळेतील शिक्षक न घेता याच शाळेतील शिक्षक घेवून गेल्या पाच वर्षापासून विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला कोणतीही माहिती नाही. तरी याचा खुलासा करून शिक्षकाची कामगिरी रद्द न केल्यास शाळेला कुलूप लावले जाईल. जो पर्यंत शिक्षक दिला जाणार नाहीं तो पर्यंत शाळा बंद केली जाईल. अशा संघटनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. तरी कृपया या सर्व प्रकरणामध्ये आपण लक्ष घालून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.
मुख्यकार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी याबाबत चौकशी करून शाळेत शिक्षक देण्यात येईल असे सांगितले तसेच जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन दांडीबहाद्दर शिक्षकांच्यावर कार्यवाही करण्याची संघटनेची मागणीही मान्य केली. शिक्षणाधिकारी श्रीमती शेंडकर मॅडम यांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक, ग्रामस्थ, यांनी शाळेस भेट देऊन वेळत शाळेत न येणाऱ्या किंवा गैर हजर शिक्षक यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. किंवा काही आॅनलाईन माहिती यासारखे कारण सांगितले तर तसे कळवावे. सदर शिक्षकाची त्या दिवसाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करू दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी पालक नागरीक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी जागरूकता दाखवावी. संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येते कि आपल्या गावातील शाळेत किती शिक्षक कार्यरत आहेत व रोज उपस्थिती किती असतात वेळेवर येतात का? याबाबत माहिती घ्यावी. जर शिक्षक उपस्थित नसेल तर रजा किंवा हालचाल रजिस्टर मध्ये नोंद केली आहे का? याबाबत माहिती घ्यावी. उपस्थित नसेल तर जिल्हा प्रशासन गटशिक्षणाधिकारी किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवावे.
शिष्टमंडळात यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर शाहुवाडी अध्यक्ष संजय डफडे, दिपक माने, भागोजी लक्ष्मण मलगोंडा माकू रामू मलगोंडा , काळू लक्ष्मण मलगोंडा , रामू बाबू मालगोंडा , नामदेव बाबू मलगोंडा , काळू तागु मलगोंडा , मनोज विठ्ठल मलगोंडा, मनोहर बाबुराव मलगोंडा ,सोनबा कोंडीबा मालगोंडा , पांडुरंग गंगाराम बाजारी , विठ्ठल धोंडीराम मलगोंडा , विठ्ठल तागु मलगोंडा , भागोजी बिरू बाजारी , रामू बिरू बाजारी, पांडू धोंडीराम मलगोंडा, विठ्ठल रामू बाजारी , कोंडीबा रामू बाजारी,लक्ष्मण काळू मलगोंडा उपस्थित होते.