आधार सेवा फाउंडेशन च्या वतीने खडकीत महिला मेळाव्याचे आयोजन

आधार सेवा फाउंडेशन च्या वतीने खडकीत महिला मेळाव्याचे आयोजन

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

अभिनेते सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून खडकी ता.दौंड येथे आधार सेवा फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, पहिल्या दिवशी न्यू फेम क्रांती नाना मळेगावकर यांचा खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,यात फ्रीज,टीव्ही,मिक्सर, पैठणी यासारखी भरघोस बक्षिसे देण्यात आली, दुसऱ्या दिवशी ब्राईट फ्युचर इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये मुलांनी गाणी,नाटक,देशभक्ती गीत असे विविध कला सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली

तिसऱ्या दिवशी महिलांसाठी हळदी कुंकू,बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन, वृक्षारोपण व त्यानंतर रात्री ह.भ.प.रुपालीताई सवने यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन आधार सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन शिंदे,सचिव योगिता शिंदे यांनी केले होते,आई वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेले आधार फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात 2011 पासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले, रोजगार हमी वर जाणाऱ्या सर्वसामान्य तरुणाने कलाकार होण्याचे स्वप्न बाळगले होते, आज ते सत्यात उतरताना विलक्षण आनंद होत असल्याचे शिंदे यांनी मनोगतात व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले होते