क्रिडाई कोल्हापूरतर्फे योगा डे साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रिडाई कोल्हापूर तर्फे 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रामसिन्हा ग्रुपच्या नागाळा पार्क येथील पुण्य प्रवाह साईट वरती आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन सकाळी 7.30 वाजता क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदीप मिरजकर, सहसचिव गणेश सावंत, संचालक विजय माणगांवकर, लक्ष्मीकांत चौगुले, संदीप पोवार व योगागुरु प्राजक्ता कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले .
यावेळी योगागुरु प्राजक्ता कुलकर्णी यांनी आजच्या धावपळीच्या जगात योगाचे महत्व पटवून दिले.आनंदी व समाधानी होण्यात विकारांचा अडथळा असतो हे अडथळे दूर केल्यास निश्चितच समाधान, श्वावत आनंद आपल्या पासून दूर नाही ते दूर करण्यासाठी योगामधील उपाय उपयुक्त ठरतील असे सांगितले, तसेच आजचा योगा दे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. हा कार्यक्रम अंत्यत चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदीप मिरजकर, सहसचिव गणेश सावंत, संचालक विजय माणगांवकर,लक्ष्मीकांत चौगुले, संदीप पोवार, क्रिडाईचे माजी उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, रामसिन्हा ग्रुपच्या चेअरमन संजीवनी ओसवाल, क्रिडाई कोल्हापूरचे सभासद श्रीधर कुलकर्णी, महेश पोवार, नारायण पोतदार,सुधाकर सुरवसे, योगेश आठले, पुण्यप्रवाह सोसायटीचे अध्यक्ष कदम व उपाध्यक्ष रितेश जोशी व सोसायटी मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सचिव संदीप मिरजकर यांनी सर्वांचे आभार मानले.