HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चरला टाळे ठोकू - आ. सतेज पाटील

अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चरला टाळे ठोकू - आ.  सतेज पाटील

कोल्हापूर : गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच काम, रखडल्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी 19 मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. याशिवाय ज्या गावांमध्ये या योजनेच काम सूरू आहे ते आजपासून बंद पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील आणि माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये संपन्न झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपकार्यकारी अभियंता डी.के. पाटील, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड, उपकार्यकारी अभियंता संजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते.

आ. सतेज पाटील आणि माजी आ.  ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांच्यासाठी ही महत्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी 343 कोटी 68 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी या योजनेचे काम करीत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. 27 महिन्याची मुदत असतानाही, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेलं नाही. यावरून आ. सतेज पाटील यांनी, या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. गेली तीन वर्ष या योजनेचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही या योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेलेल नाही. आम्ही योजना आणली म्हणून राजकारणातून कोणी विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवू. यापुढे काम सुरू करू देणार नाही. आम्ही कामं बंद पाडणार असा इशाराही आ. सतेज पाटील यांनी दिला.

माजी आ.  ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुमच गुणगाणं ऐकायला आम्ही येथे आलेलो नाही. तुम्ही यामध्ये राजकरण आणणार आहात काय? लोकांचा उद्रेक झाला आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी गेलेले नाहीत, केवळ कागदोपत्री काम चालू आहे. आम्हाला तुमच्या समस्या सांगू नका.कामे वेळेत पूर्ण करा. मनुष्यबळ वाढवा अशा सूचनाही आ. सतेज पाटील यांनी केल्या. 

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी या योजनेला कोण वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामामुळे लोकांच्या प्रश्नांना तोंड आम्हाला द्यावें लागत असल्याचे त्यांनी सांगितले. उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी, कंपनीने ठीक ठिकाणी पाईपलाईन साठी रस्ते उकरून ठेवले आहेत. पावसाळा आला आहे. त्यामुळे मोठा चिखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडी चे माजी सरपंच अमर मोरे, युवराज गवळी यांनी, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड यांची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी बैठकीत केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी, वेळेत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली असल्याचे सांगितले. 

या बैठकीला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कनेरीचे सरपंच निशांत पाटील, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी किरण आडसूळ, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उचंगावच्या उपसरपंच शीला मोरे, उजळाईवाडी ग्रामपंचायत सदस्य सारिका माने, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 

 

 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.