Ssc Result 2025 : अनुष्का - तनुष्काची कमाल.. दिसायला सेम टू सेम ,गुणही सेम

Ssc Result 2025 : अनुष्का - तनुष्काची कमाल.. दिसायला सेम टू सेम ,गुणही सेम

बीड : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असताना, बीड जिल्ह्यातील जुळ्या बहिणींनी आपल्या अनोख्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एकसारखे दिसणाऱ्या या बहिणींनी सेम टू सेम गुण मिळवून खरंच ‘जोडी नंबर वन’ असल्याचं सिद्ध केलं आहे.

अनुष्का आणि तनुष्का – गुणही एकसारखेच!

आष्टी येथील दत्त मंदिर परिसरातील रहिवासी धीरज देशमुख यांच्‍या जुळ्या मुली अनुष्का आणि तनुष्का  यांनी दहावीच्या परीक्षेत 96% गुण मिळवले आहेत. विशेष बाब म्हणजे दोघींना प्रत्येक विषयात जवळपास सारखेच गुण असून, सायन्स विषयात तर तंतोतंत एकसारखे मार्क आहेत!

या दोघी बहिणी आष्टी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत शिकत होत्या. त्यांनी कोणतीही खासगी शिकवणी न घेता फक्त शाळेतील मार्गदर्शनावर आधारित अभ्यास करून हे यश मिळवलं आहे. गावात आणि जिल्ह्यात त्यांच्या समसमान गुणांबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे.

 ‘काँग्रेसचीही भागात चर्चा ’ 

नंदुरबार जिल्ह्यातील नवागावमधील आश्रमशाळेत शिकणारा एक विद्यार्थी त्याच्या नावामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचं नाव आहे . ‘काँग्रेस’ लाडका वास्कले. विशेष म्हणजे, नंदुरबार हे एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे, आणि कुटुंबाने मुलाचं नावही ‘काँग्रेस’ ठेवलं. निकालात मात्र काँग्रेसची वाट लावली गेली . हिंदी आणि विज्ञान विषयात पास झालेल्या काँग्रेसला इतर चार विषयात नापास व्हावं लागलं. शाळेचा एकूण निकाल ९४% लागला असला तरी काँग्रेसच मात्र या यशाच्या रांगेतून बाहेर पडला आहे.