शरद शिक्षण संकुलनात शिक्षणासोबत संस्काराचे धडे : उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे

शरद शिक्षण संकुलनात शिक्षणासोबत संस्काराचे धडे : उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे

जैनापूर प्रतिनिधी  : विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वत:शी, आपल्या लक्ष्याची स्पर्धा करायला हवी. स्वत:चे परिक्षण करा. काम करताना ते अव्दितीय व सर्जनशील कसे होईल याच्याकडे लक्ष द्या. वेळेचे योग्य नियोजन करा. वेळ जिंकलात तर जग जिंकलात. आपले आचार, उच्चार व विचार हे संवेदनशील असावेत आणि त्याला शिस्त असावे. हे केलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शरद शिक्षण संकुलामध्ये गुणवत्तेपूर्ण शिक्षणासोबत संस्काराचे धडे दिली जातात. त्यामुळे शरद कृषीचे विद्यार्थी सर्वगुण संपन्न आहेत. असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले. ते जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.

यावेळी शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी, आबासाहेब घाडगे, राहुल तोडकर, संस्थेच्या सचिव सौ. स्वरुपा पाटील यड्रावकर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, ट्रस्टी अजय पाटील यड्रावकर उपस्थीत होते. 

यावेळी बोलताना वाघमोडे म्हणाले, अॅग्रीकल्चर या नावामध्येच कल्चर आहे. अॅग्रीकल्चरचे विद्यार्थी प्रशासनात जास्त आहेत. प्रशासन सांभाळत, दैनदिन कामे करीत समाजातील कल्चर सांभाळत आहेत. मुलांनी अभासी दुनियेत बळी जावू नका. ध्येय ठरवा, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट प्रयत्नसाध्य असते. त्यामुळे प्रयत्न करा, त्यामध्ये सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल. प्रत्येकामध्ये गुणवत्ता आहे, क्षमता आहे.

यावेळी सुर्यवंशी म्हणाले, तुम्ही सर्वजण एका विशाल वृक्षाचे फांद्या आहात. कृषीच्या विद्यार्थ्यांमधील एकता, परस्पर संबध खूप अधिक असते. प्रशासनात काहीतरी वेगळे करण्याची ताकद कृषीच्या विद्यार्थ्यांमध्ये असते. महाराष्ट्र प्रशासनात मुख्य बेस कृषीच्या विद्यार्थ्यांचा आहे. 

अनिल बागणे म्हणाले, शरदने गुणवत्तेच्या बाबतील सर्व मापदंड ओलांडले आहेत. आता समाज, राज्य व राष्ट्र बलवान व्हायचा असेल तर समाजातील तरुण निर्व्यसनी व सुसंस्कारीत असायला हवेत. यासाठी शरद शिक्षण संकुल तरुण निर्व्यसनी व संस्कारी होण्यासाठी प्रयत्न करत राहिल. यावेळी आबासाहेब घाडगे, राहुल तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

 यावेळी बेस्ट टिचर म्हणून प्रा. अमित माळी, बेस्ट स्टाफ प्रसाद गडगले, सर्वोत्तम विद्यार्थी समृध्दी पाटील, राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत यश मिळविलेबद्दल रिया वडगांवकर, मसिरा मुल्ला, आर्या गायकवाड एन.एस.एस. सर्वोत्तम स्वंयसेवक पुरस्कार श्लोक पदमाळे या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आंतर महाविद्यालयीन, आंतर विद्यापीठ तसेच राज्यस्तरावरील विविध खेळांमध्ये पारितोषिक विजेत्या खेळाडूंचा तसेच शैक्षणिक व इतर सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सारीका कोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण, प्रा. पूजा भोसले यांनी केले. आभार प्रा. अमित माळी यांनी मानले. 

यावेळी उपप्रचार्य प्रा. संजय फलके, विद्यार्थी परिषदेचे साक्षी जाधव, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.