अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये 'ग्रीन स्किल्स आणि एआय' कार्यशाळा संपन्न

अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये 'ग्रीन स्किल्स आणि एआय' कार्यशाळा संपन्न

वाठार तर्फ वडगाव प्रतिनिधी : येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाने एज्युनेट फाउंडेशन वतीने विद्यार्थ्यांसाठी "ग्रीन स्किल्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.)" या विषयावर १० दिवसांची कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली. या कार्यशाळेमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या ४१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ग्रीन टेक्नोलॉजी, पर्यावरणपूरक कौशल्ये आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल सखोल मार्गदर्शन प्राप्त झाले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली. 

सदर कार्यशाळेमध्ये तांत्रिक कौशल्याबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन स्किल्स देखील विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कार्यशाळेसाठी एज्युनेट फाउंडेशनचे योगेश राजे, आदित्य डंबाले, सागर यादव, मारिओ टोकचाम, सार्थक नारनोर आदींनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि केस-स्टडीद्वारे मार्गदर्शन केले.

कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी उपयुक्त कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या कार्यशाळेद्वारे उपलब्ध करून दिल्याचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी सांगितले.

कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष‌ विजयसिंह माने, जि. प. माजी सदस्या मनीषा माने, संचालक डॉ. अजय देशमुख, उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी आदींचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. सुरज रेडेकर, ट्रेनिंग कॉर्डिनेटर प्रा. अनिल देसाई, प्रा. एस. एस. रांजणे यांचे सहकार्य लाभले.