HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

एक लडाई खतम तो दुसरी शुरू होगी अब लगता है की सारी दुनिया हमारे साथ होगी -क्षितिज पटवर्धन

एक लडाई खतम तो दुसरी शुरू होगी अब लगता है की सारी दुनिया हमारे साथ होगी -क्षितिज पटवर्धन

कोल्हापूर प्रतिनिधी : के.आय.टी. अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने १२ व्या ‘अभिग्यान’ या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन रविवार दि.१ डिसेंबर २०२४ रोजी हॉटेल सयाजी येर्थे करण्यात आले होते.

वॉक विथ वर्ल्ड या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने याचे आयोजन करण्यात येते. निरनिराळ्या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे काम करणाऱ्या नामवंतांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक कॉटन किंग चे कार्यकारी संचालक कौशिक मराठे यांनी केले. तुमची आवड, अचूकता व चिकाटी यांची योग्य सांगड हाच यशाचा मुलमंत्र आहे असे सांगितले. प्रथम सत्रात प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक गीतकार क्षितिज पटवर्धन यांची मुलाखत प्रा. प्रमोद पाटील घेतली. अतिशय हलक्या फुलक्या झालेल्या या मुलाखतीत त्यांनी आपला प्रवास उलगडून सांगताना यश पुरवाव लागत तर अपयश मुरवाव लागत हा संदेश दिला. जलपुरूष अशी पदवी मिळालेले प्रसिद्ध पर्यावरण संरक्षक डॉ. राजेंद्रसिंह यांनी भविष्याची स्वप्ने पाहताना पर्यावरण मानवता परिवर्तन व विकास शाश्वत असण्याची गरज स्पष्ट केली. डॉ. राजेंद्रसिंह यांना लोकांना पाण्याची गरज जास्त आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जमिनीच्या अंतर्भागाचा अभ्यास करून राजस्थानात हिरवळ कशी फुलवली हे सांगताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जमिनीवर प्रेम करावे असे आवाहन केले

याच सोबत द्वितीय सत्रात सुप्रसिद्ध, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम व प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. उज्वल निकम यांनी तरुणाईने कायद्याबाबत आदर बाळगायला हवा. पण कायद्याची भिती असण्यापेक्षा वचक हवा. सोशल मिडीया बाबत कमालीची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले. खांडकेकर यांनी विविध माध्यमातून संवाद कौशल्य व अभिनय करताना आपल्यात असलेल्या न्यूनगंड वर मात करून योग्य आहार, आरोग्य व फिटनेस या विषयातही सजग राहाण्याची गरज अधोरेखित केली. स्वप्ने पहा व त्याचा पाठपुरावा करताना कितीही कष्ट लागले तरी ते करण्याची तयारी ठेवा असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र भरातून या कार्यक्रमासाठी ८५० हून अधिक विद्यार्थी तर विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रातील५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत के आय टी चे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, उद्योजक मोहन घाटगे, महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन व्हनरोट्टि, रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय साठे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. या विद्यार्थी परिषदेसाठी मुख्य प्रायोजक आय.सी.आय.सी.आय. बँक सहित इतर प्रायोजकांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन वॉक विथ वर्ल्ड चे शिक्षक समन्वयक प्रा. अमर टिकोळे व सहसमन्वयक प्रा. प्रसाद जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी शार्दुल सपकाळ, प्रेरणा पाटील, अदिप देसाई व इतर विद्यार्थी सदस्य यांनी केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.