अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश व करिअर मार्गदर्शन शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स (स्वायत्त महाविद्यालय) आयोजित “अभियांत्रिकीमधील करिअर संधी व प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन" शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गेल्या तीन - चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतून ७००० हून अधिक विद्यार्थी-पालकांना याचा लाभ झाला. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी सहभागी विद्यार्थी-पालकांना करिअर निवड, अभियांत्रिकी मधील करिअर संधी, बदलता अभ्यासक्रम, विविध शाखांची माहिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व आदी विषयांवर विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.
जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार, प्रा. राहुल पसाले, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी यांनी विविध सत्रांद्वारे 'अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया' याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, कॅप राऊंडमधील महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्ती योजना, आवश्यक कागदपत्रे आदींचा समावेश होता.
शिबिराचे आयोजन डीन स्टुडंट्स अफेअर्स डॉ. जे. एम. शिंदे व कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. सुरज रेडेकर यांनी केले. शिबिरातील विविध सत्रांचे सूत्रसंचालन प्रा. गणेश लोळगे यांनी केले. सदर शिबिराद्वारे करिअरची दिशा ठरविण्यासाठी अचूक व नेमके मार्गदर्शन झाल्याची प्रतिक्रिया विविध विद्यार्थी - पालकांनी दिली.
या शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जिल्हा परिषद माजी सदस्या मनीषा माने व महाविद्यालयाच्या नूतन संचालक डॉ. सौ. एस. आर. चौगुले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.