HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

 कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व सर्व संचालक व अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ मुंबई (गोरेगाव) येथील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे संपन्न झाला.

          या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ म्हणजे गुणवत्ता हे समीकरण दृढ झाले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदारपणा, चव यामध्ये गोकुळने सातत्य ठेवले आहे. यामुळे गोकुळची ख्याती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडत आहे. विविध देशातून दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर गोकुळ फुलला आहे. गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक हिताच्या योजना राबविल्या. या प्रदर्शनामध्ये दुग्धव्यवसायातील नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळल्या असून या प्रदर्शनात १२० हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी झाल्या आहे. त्याचबरोबर गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी-कर्मचारी व सर्व संबधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे.

          इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनतर्फे पाच ते सात डिसेंबर २०२४ या कालावधीत इंटर डेअरी प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात देशभरातील नामवंत दूध संघांचा सहभाग आहे. दुग्ध व्यवसायाशी निगडीत मशिनरीजचे स्टॉल हे प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनात गोकुळ दूध संघांचा स्टॉल आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे.

          गुरुवारी, सायंकाळी बाँम्बे एक्झीबिशन सेंटर येथे इंटर डेअरी अॅवार्ड पार पडला. अतिशय दिमाखात पार पडलेल्या या सोहळयात प्रतिदिन १० लाख लिटर पेक्षा अधिक दूध हाताळणी, टी.एम.आर., आयुर्वेदिक पशुपूरक प्रकल्प, डेअरी मधील काडा सिस्टीम, सुख चारा व योग्य डेअरी व्यवस्थापन व नवनवीन तंत्रज्ञानाची दखल घेऊन गोकुळ दूध संघाला इंटर डेअरी अॅवार्डनी सन्मानित केले.

          पशुसंवर्धनासाठी उपयुक्त ठरलेल्या या हर्बल प्रकल्पाची देशपातळीवर गवगवा झाल्याचे पुरस्काराच्या निमित्ताने स्पष्ट झाले. पशुसंवर्धनासाठी पूरक हर्बल प्रकल्प व प्रोसेसिंग अॅटोमेशनमधील कामगिरीची दखल घेऊन गोकुळला इंटर डेअरी अॅवार्डनी सन्मानित करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

          याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, गुजरात अमूल दूध डेअरी चेअरमन शामलभाई पटेल, सुमूल दूध डेअरी चेअरमन मानसिंहभाई पटेल, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरीषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, आय.डी.एफ.चे प्रतिनिधी अनिल पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.