आजपासून दाजीपूर घाटातील एसटी बससेवा सेवा सुरू

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
गेली महिनाभर बंद असलेली एसटी आजपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिले आहे
एक एप्रिल ते 31 मे अखेर राधानगरी फोंडा रस्त्यावरील 28 लहान पूल दुरुस्तीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती पण वन खात्याने ती 28 पूल दुरुस्ती परमिशन दिली नाही त्यामुळे या भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी आज दिनांक 27 एप्रिल पासून सिंधुदुर्ग व कोल्हापूर बसेस चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
यामुळे सिंधुदुर्ग व दाजीपूर परिसरातील लोकांचे होणारे हाल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्या मुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे