आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना अडवतंय कोण?

आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना अडवतंय कोण?

मुंबई : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली. अजूनही यातील  एक आरोपी फरार आहे.

या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे येत आहे. वाल्मिक कराडसह आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी  संबंध असल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात  येत आहे. तसेच आता सत्ताधारीही त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकत आहेत.   

याबाबत आता ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन महायुती सरकारला घेरले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा घेण्यापासून कोणी रोखले आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल अदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांना राजीनामा देण्यापासून तसेच मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्यापासून कोण अडवत आहे? मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का? की काही वेगळा युतीधर्म आहे. हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे.” असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांचे पूर्ण संरक्षण आहे. हे ईव्हीएम सरकार असल्याचे म्हणत जेवढे भ्रष्ट मंत्री आहेत, त्यांना हे सरकार संरक्षण देत राहिलं, असा घणाघाती आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वाल्मीक कराडला जामीन मिळणार का ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला हात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई  करण्यात आली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी कोर्टाने सुनावली आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला बीड कोर्टाने कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टासमोर केली आहे. आज कराडच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्ट वाल्मीक कराडला जामीन देते की सीआयडीची मागणी मान्य करते ते पहावे लागणार आहे.