आर तामिळ सेल्वनांचा संजय राऊतांवर घणाघात,म्हणाले...
मुंबई : "अटलबिहारी वाजपेयींनी २४ पक्षांसोबत मिळून सरकार चालवले होते. त्यांनी नेहरूंचा नेहमीच आदर केला, पण सेवेच्या माध्यमातून आपण दोघांची तुलना करूच शकत नाही. अटलबिहारी वाजपेयींचा विषय वेगळा आहे". संजय राऊत यांच्या दाव्यावर भाजप नेते म्हणाले, "संजय राऊत यांनी महाराष्ट्रासाठी काय केले?"राऊतांचा स्वतःचा असा कोणता मुद्दा आहे? अशी टिका मुंबई भाजपचे नेते आर तामिळ सेल्वन यांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल "अटलबिहारी वाजपेयी पंडित नेहरूंच्या तत्त्वांचे पालन करून त्यांच्यापुढे नतमस्तक झाले" असे वक्तव्य केल्याने मुंबई भाजपचे नेते आर तामिळ सेल्वन म्हणाले, "नेहरू आणि अटल वाजपेयींचा विषय वेगळा आहे, पण मला असे वाटते की संजय राऊतांकडे आता हेच काम बाकी आहे".
संजय राऊत प्रसार माध्यमांमध्ये इतर पक्षांच्या मुद्द्यांवर बोलतात. त्यांचा स्वतःचा असा कोणता मुद्दा आहे? संजय राऊत पक्षाबद्दल बोलतात, पण सेवेबद्दल एक दिवसही बोलत नाही. परभणी हिंसाचारप्रकरणी राहुल गांधींच्या आरोपावर "संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तपासानंतर सर्व तथ्य समोर येईल." असे भाजप नेते म्हणाले,
"महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता दुसरा कोणीही होऊ शकत नाही. महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेणारे, महाराष्ट्रात विकास घडवून आणणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. राहुल गांधी आणि संजय राऊत यांचे एकमेव काम म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करणे हेच आहे,अशी टिकाही सेल्वन यांनी केली.
भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्यात 'त्यांची' महत्त्वाची भूमिका
"भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्यात आणि जनतेची सेवा करण्यात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.भारतीय जनता पक्षाला तीन खासदारांवरून ३०३ खासदारांपर्यंत वाढवण्यात त्यांनी केलेले विलक्षण कार्य हे पक्ष मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक सेवेवर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांनी केलेल्या त्यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा पुरावा आहे",असंही आर तामिळ सेल्वन म्हणाले.