HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आर्किटेक्चर ही सर्वाधिक उद्योजक निर्माण करणारी शाखा- डॉ. ए. के. गुप्ता

आर्किटेक्चर ही सर्वाधिक उद्योजक निर्माण करणारी शाखा- डॉ. ए. के. गुप्ता

कोल्हापूर (प्रतिनिधी) :आर्किटेक्चर ही सर्वात जास्त उद्योजक निर्माण करणारी शाखा आहे. आर्किटेक्चरच्या पाच वर्षांच्या अभ्यासानंतर सरकारी नोकरी, अर्बन डिझाईन अँड  प्लांनिंग, इंटिरिअर डिझाईन, लँडस्केप आर्किटेक्चर, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये करियरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.  बांधकाम निर्मिती व्यवसाय हा सतत वाढतच राहणार असल्याने सहाजिकच वास्तूविशारद म्हणजे आर्किटेक्टची खूप गरज नेहमीच राहणार आहे. त्यामुळे उत्तम करिअरसाठी विद्यार्थ्यानी आर्किटेक्चर शाखेची निवड करावी असे आवाहन  डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. 

  कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित आर्किटेक्चर(वास्तुकला) प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये डॉ. गुप्ता बोलत होते.  आर्किटेक्चर ही इमारती आणि इतर भौतिक संरचनांची रचना आणि बांधकाम करण्याची कला आणि विज्ञान आहे. त्यामध्ये इमारतींचे नियोजन, डिझाइन आणि बांधकाम आणि कार्यशील, सौंदर्यदृष्ट्या सुखकारक आणि टिकाऊ असलेल्या इतर भौतिक संरचनांची प्रक्रिया आणि उत्पादन यांचा समावेश होतो.  आर्किटेक्चर हे एक बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे जे कला, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची जोडणी करून मोकळी जागा आणि संरचना तयार करते. आपल्या आजूबाजूच्या जगण्याशी, कार्य करण्याच्या आणि परस्परसंवादाच्या पद्धतीला आकार देण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय गेली 11 वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आले आहे.  या सेमिनारमध्ये आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर डॉ. गुप्ता सविस्तर मार्गदर्शन केले . यामध्ये आर्किटेक्चर शिक्षणाची सद्यस्थिती, आर्किटेक्चरमधील भविष्यातील ट्रेंड, आर्किटेक्चर नंतरच्या करिअरच्या विविध संधी, आरक्षण व जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप, नाटा 2024 च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजचा कट ऑफ, प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलोटमेंट याबाबतही डॉ. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंकांचे सविस्तर निरसन  सुद्धा केले.  यावेळेस प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे ,अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी  व आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रो. इंद्रजीत जाधव तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.