श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला शासनाची मंजुरी; संस्था अध्यक्ष -अर्जुन आबिटकर

श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला शासनाची मंजुरी; संस्था अध्यक्ष -अर्जुन आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी) : युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी, ता.भुदरगड संचलित नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मंजूरी मिळाली होती. या कॉलेजला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली असून तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मंजुरी दिली असून DTE कोड 16121 मिळाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे की, चालू शैक्षणिक वर्षापासून भुदरगड तालुक्यातील पाल येथे डिग्री इंजिनीअरींग कॉलेज अर्थात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, रायगड (DBatu) या युनिव्हर्सिटीचे संलग्नाता मिळालेली आहे. 

यामध्ये सिव्हील इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता, कॉम्प्युटर इंजिनीअरींग 120 विद्यार्थी क्षमता, मेकॅनिकल इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता, इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता व आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए.आय) ॲन्ड डाटा सायन्स इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता हे अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून यावर्षी पासून बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वरील वरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

  प्रशस्त इमारत व निसर्ग संपन्न परीसरामुळे विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजकरीता प्रशस्त इमारत बांधण्यात आली असून सदरची इमारत ही निसर्ग संपन्न परिसरात आहे. यामुळे शहरातील सिमेंटच्या जंगलापेक्षा या निसर्ग संपन्न परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार आहे.