आर्टीसन कार्ड हस्तकला कारागीर कार्ड मेळावा संपन्न

आर्टीसन कार्ड हस्तकला कारागीर कार्ड मेळावा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधि: सोनार एकता फौंडेशन यांच्यामार्फत सर्व सोनार करिता आर्टीसन कार्ड पंतप्रधान विश्वकर्मा योजना या कर्ज योजनांचे सर्वसामान्य सोनार समाजाला फायदा मिळवून देण्यासाठी मेळावा पार पडला. शनिवार दि -२० जुलै २०२४ झालेल्या या मेळाव्याला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातुन सोनार समाज उपस्थित राहिला होता.

या मेळाव्याला मार्गदर्शन करणेसाठी भारतीय स्वर्णकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दुलीचंद कडेल जी हे खास जयपूर, राजस्थान मधुन आले होते, त्यांच्याबरोबर भारतीय स्वर्णकार संघाचे सर्वं राष्ट्रीय पदाधिकारी नाशिक, मुंबई येथुन उपस्थित होते.

 दुलीचंद जी कडेल यांनी आर्टीसन कार्ड चे महत्व सोनार समाजासाठी कीती महत्वाचे आहे याची माहिती दिली. त्याचबरोबर सरकारी योजनांचे फायदे सोनार समाजाला मिळवून देणेसाठी दिल्ली दरबारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन देण्याचे आश्वासन दिले.

कारागिरांना आर्टिसन कार्ड मोफत मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारच्या हस्तकला मंत्रालयाचे हस्तकला आयुक्त चंद्रशेखर सिंग सर यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले.

   जिल्हा उद्योग केंद्राचे कोल्हापूर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. जवंजाळ साहेब यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती व योजनेच्या अंमलबजावणी साठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सोनार समाजाने स्वतः पुढे येण्याची गरज असल्याची भावना बोलुन दाखवली. तसेच सरकारच्या PMEGP व CMEGP या योजनांचा फायदा सोनार समाजासाठी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

  कोल्हापूर जिल्हा कामगार सहाय्यक आयुक्त विशाल घोडके साहेब यांनी सोनारांना आवश्यक ते पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सोनार एकता फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर )यांची भारतीय स्वर्णकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले.  पोतदार यांनी सोनार एकता फाउंडेशन चा उद्देश व सोनार समाजाने एकत्र येण्याची गरज कीती महत्वाची आहे याचे महत्त्व विशद केले.

सदर मेळाव्याला सोनार समाजाने प्रचंड प्रतिसाद दिला व एकाच दिवसात पाचशे पेक्षा अधिक सोनारांनी आर्टीसन कार्डची नोंदणी केली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौडेशचे सचिव नचिकेत भुर्के यांनी केले तर आभार प्रदर्शन फौडेशन उपाध्यक्ष अनिष पोतदार यांनी केले. या वेळी सर्व शाखा सोनार व सोनार संघटना च्या अध्यक्ष चा सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमाला सोनार एकता फाउंडेशन चे खजानिस रामदास रेवणकर, संचालक मिनेष पोतदार,  मोहन पोतदार , राजकुमार धर्माधिकारी , उपस्थित होते