श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीने बसचा शुभारंभ
वारणानगर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोतोली परिसरातील दुर्गम भागात असणाऱ्या कोलोली, उंड्री व इतर खेडयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वारण्यात येण्यासाठी दळणवळणाची समस्या दळणवळणाची समस्या भेडसावत होती. ही गरज ओळखून वारणा विविध उद्योग शिक्षण समुहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांच्या संकल्पनेतून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी , ऑटोनोमस वारणानगर अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे कोतोली ते वारणानगर या मार्गावर इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, डिप्लोमा या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी बसची सोय करण्यात आलेली आहे.
ह्या बसचा मार्ग कोतोली आसूर्ले, पोर्ले, कोतोली फाटा, वाघबीळ, माले वारणानगर असा राहील. ही सेवा विद्यार्थ्यांना माफक शुल्क मध्ये उपलब्ध असेल अशी माहिती श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी दिली. या बसचा शुभारंभ डॉ. एस. एम पिसे, डीन आणि प्र. प्राचार्य डॉ. डी एन माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. बी . आर.बागणे व बस इन्चार्ज प्रा. अमर पाटील उपस्थित होते.