इचलकरंजीत आयुक्त पदावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वादावादी
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे होते. परंतु त्यांची बदली झाल्याने पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. परंतु या बदली विरोधात दिवटे यांनी मॅट कोर्टात धाव घेत बदलीवर स्थगिती घेतली. त्यामुळे ते आज आपल्या आयुक्त पदाचा भार सांभाळण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेत आले होते. यावेळी अधिकारी दिवटे आणि पल्लवी पाटील यांच्यात चांगलाच वादावादीचा खेळ रंगला. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी आयुक्त पदाचा भार सांभाळत आयुक्त कार्यालयात खुर्ची टाकून ठाण मांडला.
यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी त्यांच्या बदलीच्या स्थगितीचे पत्र पल्लवी पाटील यांना सुपूर्द केलं. यानंतर पल्लवी पाटील यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर त्यांनी आयुक्त कार्यालयातून निघून जाणं पसंत केलं. या काळात आयुक्त कार्यालयात दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये रंगलेला वाद चांगलाच चर्चा विषय ठरला होता.