वारकरी दिंडीत समरजितसिंह घाटगे मनोभावे सामील
कोल्हापूर (प्रतिनिधि) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश,गोवा आदी राज्यातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरकडे जात असलेल्या पायी दिंडीत
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे दाखल झाले व विठ्ठलाचे चरणी लीन झाले.राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडू दे, शेतकरी व सर्व जनता सुखी होऊ दे ,त्यांना चांगले आरोग्य लाभु दे असे विठ्ठलाचे चरणी त्यांनी साकडे घातले.
पंढरपूर मार्गावरील शेकडो वारकरी दिंड्यांची त्यांनी गळाभेट घेतली. श्री विठोबाच्या दर्शनासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून शेकडो किलोमीटरची पायपीट करत असलेल्या या वैष्णवांच्या दिंड्यांना त्यांनी हरिपाठ व शिधा वितरण केले. या मार्गावर असलेल्या हजारो वैष्णवांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. काही माता-भगिनी माऊलींसमवेत फुगडीचा फेरही धरला. गळ्यात विना व हातात टाळ घेऊन त्यांनी वारकऱ्यांसोबत काही अंतर पार केले. सुळकूड ता.कागल येथील पायी दिंडीतील वारकऱ्यांसमवेत त्यांनी महा प्रसाद घेतला.
कुरुकली, पिंपळगाव ,मळगे, कसबा सांगाव, बेलेवाडी मासा, करनूर, बामणी ,एकोंडी सुळकुड हमिदवाडा शंकरवाडी गलगले अलाबाद कापशी खडकेवाडा लिंगनूर हणबरवाडी वंदूर बेलवळे आदी गावातील पायी दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. या वारकऱ्यांचे आशीर्वाद मिळाल्याची भावना बोलून दाखवली व सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.