इचलकरंजीमधील जुना पूल वाहतुकीसाठी बंद!

इचलकरंजीमधील जुना पूल वाहतुकीसाठी बंद!

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील पंचगंगा नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 57 फूटांवर पोहोचली आहे. पाणी पुलाला स्पर्श करत असल्याने महापालिकेने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोट आणि जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. महापालिकेने १५० कर्मचारी तैनात ठेवले आहेत. याशिवाय, पूरग्रस्त नागरिकांसाठी चारा छावणी आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना सुरक्षित रहाण्याचे आणि आवश्यक त्या सूचना पाळण्याचे आवाहन करत आहे.