संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए ची बैठक; 'इंडिया आघाडीच्या' आकांक्षावर पाणी?
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी आज एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली आहे. यावेळी अमित शाह, नितीन गडकरी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या आदी नेत्यांनी संसदीय दलाचे नेते म्हणून पाठिंबा दिला. यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
इंडिया आघाडीने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधल्याची चर्चा आहेत. पण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीएबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापेनेच्या आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीकडे येतील, या आकांक्षांवर पाणी फेरलं आहे.