ईद फेस्टिवल यांच्या वतीने थंड पाणी पुरवठा केंद्राचे उद्घाटन संपन्न
मुबारक आत्तार
तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच पूर्वी सामजिक कार्यात अग्रेसर असणार्यां संस्था, संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरू करायचे. यात काही संवेदनशील नागरिकदेखील स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून द्यायचे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे काम केले जायचे. रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली, की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायची आणि नंतरच पुढचा मार्ग धरायची. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात ग्रामीण भागात हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र दुर्दैवाने अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे.म्हणूनच ईद फेस्टिवल कमिटी बिंदू चौक कोल्हापूर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्यंत भाविककांना व नागरिकांना बिंदू चौक येथे मोफत शुद्ध व थंड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
दि. 13/4/23 रोजी मा. जयेशभाई कदम उद्योगपती यांच्या हस्ते पाणी पुरवठा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांचे उपस्थिती संपन्न झाला.
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, बाळासाहेब मोमीन, शौकत बागवान तडाका मलिक बागवान, मुस्ताक तहसीलदार, रहीम महात मुस्ताक तहसीलदार
विकी पंडित सईद्द तांबोळी,फैयाज बागवान उपस्थितीत होते.
अं
बाबाई मंदिर ला येणारे भावी आणि नागरिक यांची सोय झाली याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.