HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय पाटील साळोखेनगर येथे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कॉम्पिटिशन संपन्न

डी. वाय पाटील साळोखेनगर येथे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कॉम्पिटिशन संपन्न

कोल्हापूर : डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर येथे प्रोजेक्ट  बेस्ड लर्निंग कॉम्पिटिशन उत्साहात संपन्न झाली. प्रथम वर्ष अभियांत्रिकी  इंजिनिअरिंग विभागामधील विद्यार्थ्यांच्या  कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकास करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डी वाय पाटील प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेज साळोखे नगरचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, कॉलेज चे प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील,  प्रथम वर्ष विभागप्रमुख अमर पाटील, विविध विभागांचे विभाग प्रमुख, संयोजक डॉ. हिना संघानी, डॉ. रणजीत निकम , सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रोजेक्टचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्यामधील कल्पकता व बुद्धिमत्ता यांचा वापर करून समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा.

कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन काळातच व्यावसायिक दृष्टिकोन रुजावा यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन नेहमी करण्यात  येते. या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी तसेच सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रथम वर्ष विभाग प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिना संघानी व डॉ. रणजीत निकम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विद्या देसाई यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष  डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माननीय आमदार  सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन  लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.