करवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेच्या वतीने सत्कार व भेटवस्तूंचे वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुका शिक्षक/ शिक्षकेतर सेवक सहकारी पत संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी सभासदांना दिवाळी भेट दिली जाते. या वर्षी शेअर्स वर ७% रोख रक्कम व स्टार कंपनीचे ५ लीटर सनफ्लॉवर गोडे तेलाचे वाटप करणेत आले.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून पदोन्नती मिळालेल्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, व्हिडीओ निर्मितीमध्ये यश मिळविलेल्या शिक्षकांचा व विविध संस्थावर चेअरमन व संचालक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करणेत आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील यांनी केले. तर संस्थे बद्दल बँकेचे माजी चेअरमन प्रशांत पोतदार यांनी संस्थेच्या पारदर्शी कारभाराविषयी माहिती दिली. यावेळी सर्जेराव सुतार, साताप्पा चौगले, बाळासो चौगले, बाजीराव कांबळे, श्वेता खांडेकर, उत्तम पोकर्णेकर यांची भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणात राजाराम वरुटे यांनी संस्था स्थापन करतांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले. आता त्याचा वटवृक्ष झाला याची माहिती दिली. संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. यापूढे संघटने शिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी संघटनेच्या पाठीशी रहावे असे आवाहान केले. तसेच नुतन केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी चांगले काम करुन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. तसेच श्वेता खांडेकर मॅडम यांच्या दिपावली शुभेच्छा कार्डाचे प्रकाशन करणेत आले.
यावेळी मारुती दिंडे, बंडोपंत संकेश्वरे शिवाजी भोसले, संजय ठाणेकर, संताजी पाटील, सरदार सरनोबत, नवनाथ व्हरकट, पांडू कुंभार, पंढरी काशीद, पत संस्थेची सुकाणू समिती, सर्व आजी माजी संचालक मंडळ, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व्हा. चेअरमन वर्षा सनगर यांनी माडले.