भविष्यात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आव्हान - माजी आमदार के.पी.पाटील

भविष्यात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आव्हान - माजी आमदार के.पी.पाटील

कागल/प्रतिनिधी : भविष्यात साखर उत्पादन वाढीसाठी सर्वच शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे आवाहन माजी आमदार के.पी.पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादन संघ व भारत अँग्रो सर्विसेस यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कागलमधील बामणी येथे ही ऊस परिषद संपन्न झाली.

यावेळी बोलताना के.पी.पाटील यांनी साखर कारखाने व शेतकरी यांच्या अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल नाना माने पाटील यांनी भविष्यातील संघाच्या ध्येय धोरणांविषयी सविस्तर माहिती दिली. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरुण मराठे यांनी ऊसबाबत माहिती दिली. पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे आवश्यक आहे.याची सखोल माहिती दिली. तसेच यासाठी भारत अँग्रो सर्विसेसच्या ऑरमिकेम

या सूक्ष्म अन्नद्रव्य खताच्या वापराने ऊसामध्ये उत्पन्न वाढीसाठी कसा उपयोग होतो याची माहिती दिली. कृषीरत्न संतोष माने ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाच घटकांवर माहिती दिली. ऊस शेतीसाठी शेणखताचे महत्त्व त्याला पर्यायी पाणी व्यवस्थापन खत नियोजन ऊसाची संख्या नियोजन या मुद्द्यांवर शेतकऱ्यांशी संविस्तर चर्चा केली. संताची घोरपडे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी उत्तम परीट यांनी आदर्श ऊस शेती बद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली. जैन इरिगेशनचे शामकांत पाटील यांनी ठिबक सिंचन ऊसासाठी कसे फायदेशीर आहे याचे विवेचन केले. या ऊस परिषदेमध्ये ऊस शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व १०० प्लस टन उत्पादन घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकरी तसेच विकास क्षेत्रामध्ये काम केलेल्या मान्यवरांचा व कृषी पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.भारत अँग्रीचे चेअरमन सत्यजीत भोसले उपस्थित होते.यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांनी आभार मानले