कर्जदार संघटना स्थापनेसाठी कर्जदार, सामान्य नागरिक, व्यापाऱ्यांनी एकत्र यावे : डॉ. संदीप गुंडकल्ली - पाटील
कोल्हापूर : सामान्य कर्जदाराला संरक्षण मिळण्यासाठी कर्ज माफीसाठी, होत असलेले शोषन थांबवण्यासाठी, बिनव्याजी, विनातारण कर्ज मिळण्यासाठी, ऑनलाईन बँकींगवर चाप बसवण्यासाठी, आजकाल बँकेत होत असलेले ऑनलाईन हजारो कोटींचे फ्रॉड थांबवण्यासाठी व भारताची उन्नती पारदर्शक व्हावी या हेतूने समाज सेवक, माहिती अधिकार कार्यकर्ता, माजी पत्रकार अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका शाहुवाडी, माजी तालुका अध्यक्ष, नव स्वराज्य चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक व ट्रस्टी संदिप प्रभाकर गुंडकल्ली- पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कर्जदार संघटना स्थापन करण्याचे नियोजन आहे. ही संघटना स्थापन करण्यासाठी कर्जदार सामान्य नागरिक आणि व्यापारी यांना जाहीर निमंत्रण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देत असल्याची माहिती नवस्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप गुंडकल्ली पाटील यांनी दिली आहे.
कर्जदार संघटना स्थापन करण्यासाठी रविवार दि.22 डिसेंबर रोजी रोजी दुपारी १ वाजता हुतात्मा पार्क, श्री.स्वामी विवेकांनद पुतळा येथे कर्जदार, सामान्य नागरिक, व्यापारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.