महेश कांजर यांचा लोकराज्य जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

महेश कांजर यांचा लोकराज्य जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

पत्रकार- सुभाष भोसलेको

कोल्हापूर : राजारामपुरी भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश मारुतराव कांजर यांनी लोकराज्य जनता पार्टीत नुकताच जाहीर प्रवेश केला.पक्षाचे मुख्य कार्यालय साने गुरुजी वसाहत येथे लोकराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते महेश कांजर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकराज्यचे जिल्हाध्यक्ष पि.के.पाटील अण्णा, महिला आघाडी कार्याध्यक्ष उज्वलाताई झेंडे,हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष कृष्णात सातपुते,तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महेश कांजर यांच्यासोबत शाहीन बालगीर( कागल), अर्जुन बागावसर (जवाहरनगर ),अष्टविनायक चव्हाण (कंदलगाव),किशन महाराज (शाहूपुरी ), असिफ बोबडे (शनिवार पेठ ),तुकाराम जाधव (राजारामपुरी), प्रभाकर वागवेकर (पापाजी तिकीट), ताजुद्दीन मुल्लानी (कसबा बावडा), उदय वास्कर (जरगनगर)या कार्यकर्त्यांनी लोकराज्य जनता पार्टीत प्रवेश केला. सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून लोकराज्य जनता पार्टी कार्यरत असून जनतेचे प्रश्न घेऊन काम करावे आणि पक्षाची विचारधारा समाजामध्ये रुजवावी असे आवाहन याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले . आभार कृष्णात सातपुते यांनी मानले.