विकासाच्या वाटेवर सदैव तुमच्यासोबत : अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी आमदार असतानाही आणि नसतानाही दक्षिण मतदार संघात मूलभूत सुविधा हाच माझा अजेंडा नेहमीच राहिला आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन असे अनेक विकासाचे मुद्दे माझ्या अजेंड्यावर आहेत. शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना सुरू झाली आहे, त्याचबरोबर भविष्यात शेतकऱ्यांना वीज देखील मोफत देण्याबाबत महायुती सरकार प्रयत्नशील आहे. ही केवळ आश्वासने नाहीत. मी खोटी स्वप्ने दाखवणार नाही. विकासाच्या वाटेवर मी सदैव तुमच्या सोबत आहे, असा विश्वास अमल महाडिक यांनी मतदारांना दिला.
निगडेवडी, मनाडे मळा भगात अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठी भेटी चा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या भेटी दरम्यान अमल महाडिक यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यावेळी या भागातील विकास कामा बाबत त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली.
या भागातील नागरिकांनी विद्यमान आमदारांच्या विकास कमाप्रती असणाऱ्या निष्क्रियतेबद्दल मनमोकळा संवाद साधला. या नागरिकांशी बोलताना अमल.महाडिक म्हणाले, दक्षिण मतदार संघात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले नाही तर रोगराई पसरायला वेळ लागणार नाही. मला सोलापूरच्या धर्तीवर कचरा व्यवस्थापन उपक्रम राबवण्याचा माझा प्रयत्न आहे. मूलभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील.
यावेळी अमल महाडिक यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिलासा दिला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. आणि आपल्या सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी येत्या 20 तारखेला कमळाचे बटन दाबून मला संधी द्या, असे प्रेमळ आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी निगडेवाडी येथील अमोल निगडे, विश्वास निगडे, शंतीनाथ निगडे, सुनील निगडे, राजेंद्र निगडे, कुणाल निगडे, भिकाजी निगडे, मोहन निगडे, बळकु निगडे, दिलीप निगडे, नंदकुमार निगडे आणि सर्व निगडे परिवारासह मनाडे मळा येथील अनिल मनडे, सर्जेराव मनाडे, कृष्णात मनाडे, वसंत मनादे, शिवाजी मनादे, बाळासाहेब मनादे, चंद्रकांत मनादे, अमोल भास्कर, प्रीतम भास्कर, हणमंत भास्कर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.