HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ला

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू  वाळूमाफियांचा  जीवघेणा हल्ला

जळगाव : चांदसर बुद्रुक (ता. धरणगाव, जि. जळगाव)   येथे गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनि कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला केला. फावड्याने केलेल्या हल्ल्यात तलाठ्याचा पाय मोडल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. दत्तात्रेय पाटील असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या महसूल संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘काम बंद’आंदोलन सुरु केले. दरम्यान, या प्रकरणी संशयित आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चांदसर बुद्रूक येथील गिरणा नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पहाटे तीनला नायब तहसीलदार संदीप मोरे, मंडल अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडल अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रेय पाटील यांचे  पथक गिरणा नदी पात्रात गेले. त्या वेळी वाळूचा उपसा करणाऱ्या १२ ते १५ जणांच्या जमावाने या पथकाला पळवून लावण्यासाठी हल्ला चढविला.

पथक तेथून पलायन करताना तलाठी पाटील माफियांच्या गराड्यात सापडले. वाळू माफियांनी पाटील यांना जबर मारहाण केली. त्यांच्या पायावर फावड्याने घाव घातला. पायाचे हाड मोडल्यावर पाटील जागीच कोसळले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस येण्यापूर्वीच वाळूमाफिया पसार झाले

राजपत्रित अधिकारी, जिल्हा ग्राम महसूल अधिकारी, जिल्हा तलाठी संघासह महसूल विभागातील विविध संघटनांनी सततच्या हल्ल्यांमुळे आणि वाळूमाफियांच्या वाढत्या मुजोरीमुळे ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले. चांदसरच्या सर्वच आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत या संघटनांनी ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली आणि भूमिका स्पष्ट केली. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.