ताम्हिणी घाटात बस पलटी होऊन ५ ठार; २७ जखमी
पुणे : पुण्याहून वऱ्हाड घेऊन निघालेली बस (एम एच १४ जी उ ३४०५) ताम्हिणी घाटात अवघड वळणावर पलटी झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलीस घटनास्थळ दाखल झाले.
पुण्यातून महाड येथील बिरवाडीकडे लग्नासाठी खासगी बस जात होती. ही बस पुण्याहून माणगांवकडे येत असताना ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटात हा बस अपघात सकाळी दहाच्या आसपास झाला.जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात होते. यादरम्यान ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस पलटी झाली आहे.