काशिग विद्यालयास माजी विध्यार्थांकडून वह्या भेट

काशिग विद्यालयास माजी विध्यार्थांकडून वह्या भेट

पुणे (प्रतिनिधी) : काशिग गावातील माजी विद्यार्थ्यांनी मिळून माध्यमिक विद्यालय काशिग, गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून आपलं कर्तव्य बजावलं. मुख्याध्यापक गायकवाड सरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी भाषण करताना सांगितले, की शाळेसाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी आम्ही पुरविण्याचे प्रयत्न करू. त्याच प्रमाणे शालेय शिक्षण घेताना, आपल्या हिंदु धर्माचे शिक्षण घेणं गरजेचं आहे.  गुरुवर्य शरदभाऊ मोहोळ यांच्या प्रेरणेतून स्वारद फाऊंडेशन आणि हिंदु जनजागृती समिती मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्वसंरक्षण वर्ग चालु करुन देऊ. त्याच प्रमाणे स्वराज्य संघटने मार्फत सामाजिक कार्य सुरू राहील अशी ग्वाही दिली.यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरज ज्ञानेश्वर टेमघरे,राजेंद्र नथु शेळके, अक्षय विठ्ठल जोरी, आकाश पोपट राक्षे, निखिल दत्तु नाकते, सुयश हनुमंत शेळके या विद्यार्थ्यांनी सहकार्य करून शाळेसाठी हातभार लावला.