श्रीमंत जयसिंगराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

श्रीमंत जयसिंगराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कागल (प्रतिनिधी) : कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे  तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानकासमोरील पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .तर शाहू साखर कारखाना प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.बस स्थानक येथे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव,आप्पासो हुच्चे,मारुती मदारे,उत्तम पाचगावे,असिफ मुल्ला,प्रमोद कदम,कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.